कागणी : सी. एल. वृत्तसेवा
दुंडगे ता. चंदगड येथील दुंडगे हायस्कूल दुंडगे च्या विद्यार्थ्यांना नववर्षाची भेट म्हणून प्रा. डॉ. एन. एल. तरवाळ यांचेकडून पोर्टेबल स्पीकर-माइक सेट देण्यात आला. प्रा. डॉ. एन. एल. तरवाळ हे दुंडगे हायस्कूल दुंडगे चे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी यापूर्वी माजी विद्यार्थ्यांतर्फे दुंडगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केलेले आहे. महापूर आपत्ती, कोरोना मध्ये त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.
डॉ. तरवाळ यांच्या हस्ते क्रिडा दिनाचे औचित्य साधून हायस्कूलने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये क्रिडा महोत्सवाचा ध्वज फडकविण्यात आला. श्री. लक्ष्मण तरवाळ यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सरपंच चंद्रकांत सनदी यांच्या हस्ते क्रिडा ज्योतिचे प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. तरवाळ यांचा हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. आर. जे. पाटील यांच्या शुभहस्ते शाल-श्रीफळ, हार-तुरे देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकविण्यासाठी विविध सुविधा देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक साधनांचा अभ्यासात वापर करून अभ्यासाप्रति गोडी निर्माण करावी. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील व विविध संशोधन संधीविषयक मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक आर. जे पाटील म्हनाले की केलेले कष्ट कोठेही वाया जात नसुन त्याचा फायदा आपसुकच आपल्यालाच होत असतो. डॉ. तरवाळ यांनी गरिबीतून शिकुन स्वतःला सिद्ध केलेले असुन ते
आपल्या हायस्कूलचा हिरा असुन आपणही त्यांच्यासारखी प्रगती करून आपले तसेच हायस्कूलचे नाव रोशन करावे. डॉ. तरवाळ यांनी आमच्या हायस्कूलला वेळोवेळी केलेली मदत निश्तितच त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शविते.
सरपंच श्री. चंद्रकांत आप्पाजी सनदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन हायस्कूलच्या अपूर्ण कामाकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. सौ. अरुणा तरवाळ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करून मोठे व्हा, आईवडीलांचे तसेच गुरुजनांचे नाव लौकिक करा, असे सांगून गणित हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्यायला सांगितले.
श्री. एस. पी. नंदयाळकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी लक्ष्मण पाटील, गजानन पाटील, अनुप्रिया तरवाळ, यशस्वी पाटील, संतोष वडर, हरिष मंजाळी, निवृत्ती तरवाळ, ज्ञानेश्वर पाथरूट, अनिकेत तरवाळ, संतोष गुंजनाळी तसेच हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. एन. टी. बेनके, श्री. वाय. व्ही. पाटील, भरमु भास्कळ, सागर सोनार, अरविंद कांबळे, विद्याधर पाटील, गणपती खन्नुकर यांनी केले तर आभार श्री. डी. डी. होनगेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment