मनोगत - चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळ चंदगड - ॲड. निवृत्ती गोविंद आजरेकर - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2023

मनोगत - चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळ चंदगड - ॲड. निवृत्ती गोविंद आजरेकर

 

ॲड. निवृत्ती गोविंद आजरेकर

        चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळ, चंदगड यांच्या वतीने फलक उद्घाटन व गुणवंताचा सत्कार कार्यक्रम १ जानेवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्या निमित्त या संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. निवृत्ती गोविंद आजरेकर यांचे मनोगत...........


           मी चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळ, चंदगड या मंडळाचा कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहे. हे काम पाहण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष भीमसेन लक्ष्मणराव राजहंस यांच्या माझ्या परिचयामुळे सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 

          या मंडळाचे सामाजिक कार्य फार चांगले आहे. समाजातील लोकांच्या तक्रारी समझोता, सोडपत्र, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-भ्रूण हत्या, स्त्री मुक्ती, अल्प बचतीचे महत्त्व पटवून देण्याची पद्धती, वृक्षारोपण, वृक्षतोड बंदी, सामुदायिक विवाह, आंतरजातीय विवाह, शैक्षणिक कार्य, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याची पद्धती या सर्व गोष्टी मी जवळून पाहिल्या. सामाजिक कार्याची तळमळ पाहून मी या मंडळाला मदत करायला सुरुवात केली. गेली ८ वर्षे मी हे कार्य करत आहे. कायदेशीर गोष्टींचा मी या मंडळाला सल्ला देतो आहे. 

       तक्रारीचे निवारण करण्याची पद्धत चांगली आहे. दोन्ही पार्ट्यांना समोर घेऊन पटवून देऊन समझोता केला जातो. त्यामुळे लोकांना पटते व तक्रारीचे निवारण होते. समझोता, सोडपत्र देखील दोन्ही पती-पत्नीला समोर घेऊन पटवून देऊन दोघांचे म्हणणे ऐकून समेट घडविला जातो. अगदी तुटत असेल तर पटवून देऊन योग्य व सत्य बाजूने निकाल दिला जातो. या कामाकरिता किरकोळ फी घेऊन तक्रार निवारण केले जाते. कोठे कायदेशीर गोष्टी चुकत असल्यास मंडळाच्या लोकांना सूचना देऊन योग्य सल्ला दिला जातो. 

             मला मंडळाचे कार्य चांगले वाटले म्हणून मी त्यांना मदत करतो आहे. मंडळाचे कार्य समाजाच्या हिताचे व कमी खर्चाचे असल्याने गोरगरिबांना, मागासवर्गीय, आदिवासी, इतर मागासवर्ग, भटक्या जातींना अगदी गरजेचे असल्याने या मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. तेव्हा समाजातील तळागाळातील व्यक्तींनी या मंडळाचा उपयोग करून घेऊन आपले प्रश्न सोडवावे अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व समाजातील सर्व घटकांना त्याचा उपयोग होईल असे मला वाटते. 

                                                        ॲड. निवृत्ती गोविंद आजरेकर.
(लेखात आलेले मत हे त्या व्यक्तीचे वैयक्तिक मत आहे. त्याच्याशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही)

No comments:

Post a Comment