तेऊरवाडी येथे शालेय आंतरवासीता कार्यक्रमाचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2023

तेऊरवाडी येथे शालेय आंतरवासीता कार्यक्रमाचे उद्घाटन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील माध्यमिक विद्यालयात तुर्केवाडीच्या महादेवराव बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आंतरवासीता उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महादेवराव बीएड कॉलेजचे प्रभारी प्राचार्य एन. जे. कांबळे हे उपस्थित होते.

          'बदलत्या काळाला अनुसरून, सृजनशील व जिज्ञासू वृर्तीचा विद्यार्थी तयार करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे' असे प्रतिपादन  एन. जे.कांबळे  यांनी केले. 'शालेय आंतरवासीता कालावधीतील प्रत्येक अनुभव भावी काळासाठी छात्र अध्यापकांना दिशादर्शक ठरेल त्यामुळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा' असे मार्गदर्शन मुख्याध्यापक पाटील यांनी केले.

          या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम गट क्र.3 ला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थापक महादेवराव वांद्रे, मार्गदर्शक ग. गो. प्रधान, एम. ए. पाटील, पी.आर.गावडे, जी.एस. पाटील, टी.एम. पवार, व्ही. डी.पाटील, टी.ए. पाटील, डी.एन.पाटील, व्हाय.डी पाटील, बी.आर. बुच्चे व सर्व बी.एड प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियांका पाटील यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्तपणे वैशाली लोहार व काजल गावडे यांनी केले तर आभार पूजा लाड यांनी मानले.



No comments:

Post a Comment