युवकांनी महात्मा गांधीजींचे चरित्र वाचून चळवळ समजून घ्यावी : कल्याणराव पुजारी यांचे प्रतिपादन, उत्तूर विद्यालयातील गांधी स्मृती व्याख्यानमाला - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2023

युवकांनी महात्मा गांधीजींचे चरित्र वाचून चळवळ समजून घ्यावी : कल्याणराव पुजारी यांचे प्रतिपादन, उत्तूर विद्यालयातील गांधी स्मृती व्याख्यानमाला

उत्तूर (ता. आजरा) येथील उत्तूर विद्यालय, उत्तूर येथे मार्ग दर्शन करताना माजी कल्याणराव पुजारी.

आजरा / सी. एल. वृतसेवा 

         राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अहिंसक मार्गाने केलेले क्रांतीकार्य नव्या पिढीला कळायला हवे. स्वातंत्र्य लढा यशस्वी होण्यासाठी  अहिंसा  मार्गाने  केलेले चळवळीचे काम समजण्यासाठी गांधी चरित्र  वाचायला हवे असे प्रतिपादन  माजी प्राचार्य  कल्याणराव पुजारी यांनी  उत्तूर  (ता. आजरा) येथील उत्तूर ज्युनिअर कॉलेज येथे  गांधी स्मृती व्याख्यानमालेत बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शैलेंद्र आमणगी होते.

            कल्याणराव पुजारी म्हणाले,``देशाच्या स्वांतञ्य लढ्यात म. गांधीजींची भूमिका महत्वाची होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न गांधीजींच्या चरित्रामध्ये अधोरेखित केले आहे. युवकांनी ही चरित्रे वाचून स्वातंत्र्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे.

        प्रास्ताविक  प्रा. आय. बी. शिवणे यांनी केले. कार्यक्रमास  प्रा. अवंतिका देसाई, प्रा. डी. आर. मुदाळकर, प्रा. एम. आर. सावरतकर, प्रा. के. एस. मस्कर आदी उपस्थित होते. प्रा. संजय खोचारे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment