तुर्केवाडी येथील जनता विद्यालयाच्या ६१ व्या वर्धापनदिनी शनिवारी विविध कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2023

तुर्केवाडी येथील जनता विद्यालयाच्या ६१ व्या वर्धापनदिनी शनिवारी विविध कार्यक्रमचंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित जनता विद्यालयाचा ६१ वा वर्धापनदिन शनिवार दि. २८ जानेवारी रोजी दुपारी १.०० वाजता आयोजित केलाआहे. या निमित्त स्मरणिका प्रकाशन, पारितोषिक वितरण व चेअरमन व संचालक कोजिमाशि पतसंस्था, कोल्हापूर यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम होणार आहेत. माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला आमदार राजेश नरसिंगराव पाटील , प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार विनोद रणवरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, आम.जयंतराव आसगांवकर, शिवाजीराव पाटील, गोपाळराव पाटील, दादासाहेब लाड आदीसह विविध मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. रात्री ७.३० वाजता श्री साई माउली प्रस्तुत सप्त सूरांच्या वेलीवर महाराष्ट्राची लोकधारा आम्ही मराठी' हा प्रायोजित कार्यक्रम होईल. तरी वर्धापनदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जी. एन. पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. यळ्ळूरकर, पर्यवेक्षक एस. ए. पाटील यांनी केले आहे.No comments:

Post a Comment