![]() |
तिलारी घाटात धोकादायक वळणावर संरक्षण कठडे तुटले आहेत त्यामुळे वाहनांना धोका निर्माण झाला आहे तर दुसऱ्या छायाचित्रात केबलमुळे दरीच्या तोंडावर असा रस्ता खचला आहे. |
दोडामार्ग / दि.२६ जानेवारी प्रतिनिधी
गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर पुणे असा जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे हा घाट रस्ता सुरक्षित असणे आवश्यक आहे. या घाटात रस्ता साईडपट्टी खोदून टाकलेली केबल त्यामुळे काही ठिकाणी घाटाचा रस्ता वळणावर खचला आहे. मोठे विवर पडले आहे तर एका धोकादायक वळणावर वाहने धडकून संपूर्ण कठडा तोडला आहे त्यामुळे अनोळखी वाहने दरीत कोसळून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी आवश्यक ठिकाणी तातडीने दूरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
तिलारी घाटात रस्ता साईडपट्टी संरक्षण कठडे याला लागून जीओ कंपनीकडून केबल टाकली पण योग्य प्रकारे सिमेंट काॅक्रींट टाकून ते बंद केले नाही त्यामुळे अनेक ठिकाणी आता केबल मुळे तिलारी घाटात काही ठिकाणी रस्ता खचला विवर पडले आहे.दरीच्या तोंडावर केबल मुळे रस्ता खचला विवर पडले आहे.
तीन वर्षांपूर्वी याच जीओ केबल मुळे तिलारी घाटात तीन ठिकाणी रस्ता खचला होता दरडी खाली आल्या होत्या वर्षेभर घाट रस्ता बंद होता जनतेचे हाल झाले होते. ही परिस्थिती पुन्हा ओढून नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने तिलारी घाटातील खचलेला रस्ता तुटलेले कठडे याचे बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे.
No comments:
Post a Comment