प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्राची कर्तव्यनिष्ठा जोपासणे हीच खरी देशभक्ती : पी. एन. केसरकर, श्री पार्वती शंकर शैक्षणिक संकुलात ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2023

प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्राची कर्तव्यनिष्ठा जोपासणे हीच खरी देशभक्ती : पी. एन. केसरकर, श्री पार्वती शंकर शैक्षणिक संकुलात ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात

आजरा / सी. एल. वृतसेवा 

          उत्तूर (ता. आजरा) येथील  पार्वती शंकर शैक्षणिक संस्था संचलित शैक्षणिक संकुलात ७४ वा  भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी  हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्था संचालक विजय सावेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण  झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तुरचे सहाय्यक ग्रामसेवक सचिन रामचंद्र येसादे हे होते.

        यावेळी पी. एन. केसरकर म्हणाले, "भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाच्या हिताची जबाबदारी घेते. हे संविधान याच दिवशी १९५० पासून कार्यवाहीत आले. शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक, सर्वांनी आपल्या कार्याच्या क्षेत्रात निष्ठा ठेवल्यास देश विकास घडतो, हीच खरी देशभक्ती होय. अशोकचक्रासारखे गतिमान राहा. भगव्या रंगासारखे त्यागी वृत्ती ठेवा. हरित रंगाप्रमाणे समृद्धीसाठी झटा.

      याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन शालेय रांगोळी स्पर्धेतील यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ते गुणवंत असेसीनियर ग्रुप, इयत्ता इयत्ता आठवी ते दहावी-प्रथम क्रमांक- कु. अवंती रामचंद्र तांबेकर, इयत्ता आठवी .द्वितीय क्रमांक- कु.सिद्धी दीपक गोरे, इयत्ता नववी. तृतीय क्रमांक- कु. हर्षदा विजय इंगळे, इयत्ता आठवी. ज्युनियर गट- इयत्ता पाचवी ते सातवी-प्रथम क्रमांक - कु.सृष्टी सुनील गिलबिले, इयत्ता सहावी. द्वितीय क्रमांक -कु. तनिष्का अशोक चौगुले, इयत्ता सातवी .तृतीय क्रमांक- कु. श्रुती बळवंत येलकर, इयत्ता सातवी. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी उपकरणे गटात प्रथम क्रमांक आलेल्या शाळेचा विद्यार्थी आदित्य मारुती पाटील, इयत्ता नववी व विज्ञान प्रश्नमंजुषा गटात तालुक्यात द्वितीय आलेल्या कु.रिया राजाराम सावंत, इयत्ता आठवी ,कु. तनया शिवपुत्र हिडदुगे, इयत्ता नववी, कु.स्वप्नाली दत्तात्रय एकल, इयत्ता दहावीयांना मान्यवरांचे हस्ते पुष्प देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत तृतीय, निबंध स्पर्धेत प्रथम, ड्रॉइंग ग्रेड  परीक्षेत ए ग्रेड, नाट्यछटा स्पर्धेत विशेष सहभाग अशा गुणवत्तेसह यशस्वी झालेल्या कु. स्वर्णिका नितीन पाटील, इयत्ता नववी या विद्यार्थिनीचा पुष्प देऊन मान्यवरांनी विशेष गौरव केला.

      संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही. एम. पाकले, प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे आदीं सर्व संचालकांच्या दिशादर्शनाखाली कार्यक्रम नियोजन यशस्वी झाले.

No comments:

Post a Comment