महात्मा गांधी हे राष्ट्रीय पातळीवरील आदर्श नेतृत्व - प्रा. सुनील शिंत्रे - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2023

महात्मा गांधी हे राष्ट्रीय पातळीवरील आदर्श नेतृत्व - प्रा. सुनील शिंत्रेचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

महात्मा गांधी हे थोर देशभक्त होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी सनदशीर लढा दिला. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या मूल्यांचे महत्त्व ओळखले. ते आयुष्यभर साधी राहणी व उच्च विचारसरणी या विचाराचा पुरस्कार करीत राहिले. गांधीजींनी वेळोवेळी जे विचार व्यक्त केले. ते आजच्या काळातही प्रस्तुत ठरतात. आज देशांतर्गत कल मिण्यासाठी तसेच जातीयतेचे निर्मूलन, खेड्यांचा विकास यासाठी गांधीजींच्या विचारांचा पुरस्कार करणे आवश्यक आहे."असे प्रतिपादन प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात' गांधी समजून घेताना' या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. डॉ. पाटील यांनी 'गांधी हे भारताचे सर्वार्थाने राष्ट्रपिता रतात. त्यांची विचारसरणी देशातील युवावर्गाने अंगीकारली पाहिजे. तरच देशाची विकासाच्यादिशेने वाटचाल सुरू राहील.' असे मत व्यक्त केले. डॉ. एन. एस. मासाळ यांनी सूत्रसंचालन केले तर ए. डी .कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कल्याणराव पुजारी, आर. पी. पाटील यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
No comments:

Post a Comment