उत्साळी शाळेला सचिन कदम यांनी दिला वॉटर प्युरिफायर भेट - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2023

उत्साळी शाळेला सचिन कदम यांनी दिला वॉटर प्युरिफायर भेट


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
        उत्साळी (या. चंदगड) शाळेला माजी विद्यार्थी सचिन राजाराम कदम यांनी वॉटर प्युरिफायर (R.O.+U.V.+T.D.S.) भेट दिला.
    विद्या मंदिर उत्साळी सचिन कदम हा माजी विद्यार्थी आहे. प्रत्येकाच्या मदतीला सदैव तयार असणारा व सामाजिक कामाची जाण आणि ती पूर्ण करण्याची आवड सचिन ला आहे. शालेय वयात चंदगड तालुक्याचे नेतृत्व करताना आपल्या भारदस्त आवाजाने व शिस्तबद्द संचलनाने बेस्ट कॅडेट चा सन्मान सचिनने मिळवला आहे. सध्या पुण्यातील कंपनीमध्ये एका उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या सचिनने 
शाळेची गरज ओळखून स्वतःहून शाळेसाठी वॉटर प्युरिफायर (R.O.+U.V.+T.D.S.) खरेदी करून दिले. व विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याची सोय करून दिली आणि यापुढेही शाळेसाठी काहीही लागले तरी ते देण्याचे अभिवचन दिले.
     सचिनने शाळेसाठी दिलेली भेट लाख मोलाची आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष देसाई, सौ. रेणूका सुतार, संदिप देसाई  यांच्यासह ग्रामस्थ व  विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत संभाजी चिंचणगी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संदिप कदम यांनी  मानले.


No comments:

Post a Comment