एस. टी. चा प्रवास हाच सुखकर प्रवास - संदीप पाटील, चंदगड आगारात प्रवाशी दिन - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2023

एस. टी. चा प्रवास हाच सुखकर प्रवास - संदीप पाटील, चंदगड आगारात प्रवाशी दिनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          एस. टी. मुळे गाव गाव जोडली गेली. प्रवाशांच्या आणि विद्यार्थी वर्गात एस. टीचे योगदान महत्वाचे आहे. कारण एस. टी. हि प्रवाशांची जोखीम  घेऊन  प्रवास करत असते. त्यामुळे खाजगी प्रवाशी वाहनांपेक्षा एस. टिचा प्रवास हा सुखकर प्रवास असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

       ते चंदगड  येथे  एस. टी. आगार व अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक प्रवाशी दिन आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तालुक्यातील एस. टी. च्या वेळे संदर्भात सूचना दिल्या. 

      यावेळी एस. टी. आगार प्रमुख अमर निकम यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विलास नाईक, प्रताप डसके, अनिल चांदेकर, विलास  कागणकर, मारुती पाटील, अमित पेडणेकर, उत्तम पाटील यांचे स्वागत केले. तसेच एस. टी ची पुजा करण्यात आली.

       यावेळी विलास नाईक यांनी प्रवाशी दिनाचे महत्व व एस. टी ची वाटचाल याबाबत माहिती दिली. आगार प्रमुख अमर निकम यांनी तालुक्यातील एस. टी. बाबत समस्या आणि प्रवाशांची होणारी कुचंबणा यावर चर्चा केली.  प्रवाशांनी एस. टी. तुनच  प्रवास करण्याचे आहवान केले. तर मारुती पाटील यांनी कर्यात विभागात एस. टी. ची अनियमितता आणि विद्यार्थी वर्गाची कुचंबणा याविषयी सांगितले.

       यावेळी प्रवाशांना १५ वर्षापासून सुरक्षित सेवा दिल्याबद्दल महंमदगौस महंमद हनिफ, विठ्ठल गुरव, तुकाराम गुरव, शिवाजी पाटील, शिवाजी शिंदे, नितीन मुदाळे, वाहक डागेकर यांचा सत्कार करण्यात आला.

      यावेळी वाहतूक निरीक्षक राजसाहेब कारेकर, संदेश सावंत, विजय पवार, बाळासाहेब चौकुळकर, प्रकाश देसाई, हणमंत काणकेकर, सुनील गावडे, सुनील भारती, शिवाजी पाटील, सुशीलकुमार तरकसे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment