हेरे येथील प्रेमांगण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये फनफेस्ट व प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2023

हेरे येथील प्रेमांगण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये फनफेस्ट व प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हेरे (ता. चंदगड) येथील प्रेमागण इंग्लिश मिडयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त फनफेस्ट व  प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमासाठी गुरुकुल कॉम्प्युटर्सचे संचालक अमोल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

    फनफेस्ट कार्यक्रमामध्ये मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे घरी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थित पालक व इतर पाहुण्यांनी सर्व स्टॉल वरती जाऊन विविध पदार्थ खरेदी करून टेस्ट केले. या कार्यक्रमाला लहान मुले व पालक यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच स्कुलच्या वतीने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना गुरुकुल कम्प्युटर्स चंदगड यांच्या वतीने ५ विजेत्यांना बक्षिस स्वरुपात क्विक हिल मोबाईल सिक्युरिटी अन्टीव्हायरस देण्यात आला. 

No comments:

Post a Comment