चंदगड तालुका कृषिमाल खरेदी विक्री संघाचे चेअरमन उदयकुमार देशपांडे सहकारमंत्री अतूल सावे यांच्या हस्ते सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2023

चंदगड तालुका कृषिमाल खरेदी विक्री संघाचे चेअरमन उदयकुमार देशपांडे सहकारमंत्री अतूल सावे यांच्या हस्ते सत्कार

मुंबई येथे चंदगड तालुका कृषिमाल फल्लो खरेदी विक्री संघाचे चेअरमन उदयकुमार देशपांडे यांचा शाल, श्रीफळ व गौरवपत्र देऊन सत्कार करताना सहकारमंत्री अतूल सावे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       महाराष्ट्रात नाचणी खरेदीमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल चंदगड तालुका कृषिमाल फल्लो. खरेदी विक्री संघाचे चेअरमन उदयकुमार देशपांडे यांचा शाल, श्रीफळ व गौरवपत्र देऊन सहकारमंत्री अतूल सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भात आणि बाजरी खरेदी करणाऱ्या संस्थाचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी बोलताना सहकार मंत्री अतूल सावे म्हणाले, ``चंदगड  महाराष्ट्रातील  हवामान व जमिन भरड धान्य उत्पादनासाठी पोषक असून भरड धान्यास चांगला दर मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. भरड धान्य पिठ व डाळी यांचा वापर आरोग्यास लाभदायक आहे. याचा प्रसार करुन भरड धान्य उत्पादन प्रक्रिया आणि विक्री यासाठी योजना आखली जाणार आहे. धान खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट काम करीत असलेल्या संस्थाना सन्मानित करण्यात येणार असे मत त्यांनी व्यक्त केले.``

No comments:

Post a Comment