चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2023

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

 

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना तहसिलदार विनोद रणवरे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तहसील कार्यालय, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी २०२३ राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. देशाचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे मतदार जनजागृती व नव मतदारांना मार्गदर्शन केले. 

        तहसीलदार विनोद रणवरे यांनी नवमतदारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावून सुशासन व सक्षम नेतृत्व राज्य आणि राष्ट्राच्या राजकारणामध्ये आणण्यासाठीची उत्तम भूमिका पार पडण्याचे आवाहन केले. सुजान नागरिक व सुसंस्कृत मतदार बनून देशाच्या विकासास हातभार लावण्याचे सांगितले. 

         महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. उपस्थितांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. एस. एन. पाटील व  प्रा. व्हि. के. गावडे यांनी केले. कार्यक्रमाला निहाल मुल्ला, अमर साळुंखे, डॉ वाघमारे, विविध क्षेत्रातील मान्यवर व बीएलओ, महाविद्यालय व तहसील कार्यालयाचा स्टाफ, स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध रांगोळी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. एन. एस. मासाळ यांनी तर आभार डॉ. एस. डी. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment