ऊस बिला पाठोपाठ इको केन कारखान्याची १५ जानेवारी पर्यंत तोडणी व वाहतूक बिल देखील जमा - प्रिथ्वी दोड्डनावर - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2023

ऊस बिला पाठोपाठ इको केन कारखान्याची १५ जानेवारी पर्यंत तोडणी व वाहतूक बिल देखील जमा - प्रिथ्वी दोड्डनावर

प्रिथ्वी दोड्डनावर
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कारखान्याबाबत उशिरा बिले हि बिलाची परंपरा खंडित करण्याच्या हेतूने ऊस बिला पाठोपाठ आता म्हाळुंगे कारखान्याने जानेवारी १५ अखेर गळीतास आलेल्या उसाचे तोडणी व वाहतूक बिले  देखील खात्यावर जमा केले आहे. ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक यंत्रणा ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही बाब लक्षात घेऊन तोडणी वाहतूक यंत्रणेस प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे असे कारखान्याच्या वतीने कारखान्याचे सीईओ प्रिथ्वी दोडडनावर यांनी सांगितले. 

         कारखान्याने दिनांक १५ जानेवारी पर्यंत गळीतास आलेल्या दोन लाख ४२ हजार मे टनाचे जाहीर दराप्रमाणे  तोडणी व वाहतूक  बिल कारखान्याने अदा केले आहे. जानेवारी १५ अखेर उस बील बिला पाठोपाठ तोडणी वाहतूक बिल देणारा देखील इको केन हा जिल्हयातील नाहीतर राज्यातील पहिला कारखाना आहे. शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करावे कारखान्याने नेहमी शेतकरी हा प्रमुख घटक म्हणून पाहिला आहे. कारखाना कोणत्याही उपपदार्थाचे उत्पादन घेत नसताना देखील फक्त साखर कारखान्यावर दिलेला दर व अदा केलेली ऊस बिल तसेच तोडणी व वाहतूक बिले ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. 

           यावेळी तोडणी व वाहतूक यंत्रणेस आवाहन  करताना सीईओ श्री. दोड्डनावर म्हणाले, ``जितका कारखान्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे. तितकाच तोडणी वाहतूक यंत्रणेत काम करणारा प्रत्येक घटक देखील महत्त्वाचा आहे. तोडणी वाहतूक यंत्रेनेस विनंती आहे की, आपण ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासोबत आपले जिव्हाळ्याचे नाते ठेवावे. तोडणी व वाहतुक यंत्रणेमुळे कारखान्यापर्यंत ऊस पोचण्यात मोठी मदत होते. आपण जेव्हा जेव्हा अडचणीत होता, कारखान्याने आपल्याला नेहमीच मदत केली आहे. करत राहणार आहे, ही बाब लक्षात घेता तोडणी वाहतूक यंत्रणेत काम करणारा प्रत्येक घटकाने कारखान्याचा प्रतिनिधी म्हणून काम करावे. शेतकऱ्यांना सहयोग द्यावा.  एखादा  सर्वसामान्य शेतकरी असेल त्याचा ऊस काढताना आपल्याकडून जरूर ते सहकार्य त्यांना करावे. भागातील ऊस काढताना काही अडचणी आल्यास तुमच्या गट ऑफिशी संपर्क साधावा.  आपल्या सहकार्यासाठी व्हॉइस प्रेसिडेंट केन धीरज दोडडनावर,  उप शेती अधिकारी निंबाळकर तसेच प्रत्येक गट ऑफिसचा स्टाफ सदैव तत्पर असेल.  या हंगामातील उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्वांनी सहकार्य करावे. कारखान्याने आपल्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असताना आपणही सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी कारखान्याचे सीएफओ आनंदकुमार केशवपल्ली,  व्हॉइस प्रेसिडेंट कॅन धीरज दोडडनावर, मॅनेजर बाबासाहेब देसाई हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment