ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2023

ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ढोलगरवाडी येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. जी. यळळूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे मार्गदर्शक व निवृत्त प्राचार्य गौळवाडी गावचे संभाजी मारुती ओऊळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

        यावेळी  शिष्यवृत्ती व सारथी शिष्यवृत्ती मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तालुकास्तरीय प्रश्नोत्तर परीक्षेमध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. स्नेहल अशोक पाटील हिचा सत्कार करण्यात आला 

              कार्यक्रमाला गावच्या विद्यमान सरपंच सरिता तुपारे, उपसरपंच व्हन्नापा तुपारे, पोलीस पाटील  राजेंद्र पाटील ,धानबा कदम, शांता टक्केकर, मा. मुख्याध्यापक शायर फर्नांडिस, प्रकाश भोगुलकर, विजय नौकुडकर सुरेश कदम, तसेच ग्रामस्थ, तरुण मंडळ, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment