तुर्केवाडी येथील करण गावडे दिल्ली येथील परेडमध्ये सहभागी - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2023

तुर्केवाडी येथील करण गावडे दिल्ली येथील परेडमध्ये सहभागी


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

     तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील  सुपुत्र व सध्या कोल्हापूर येथील रहिवासी करण नंदकुमार गावडे याने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये सहभाग घेतल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. करण नंदकुमार गावडे हा ३ महाराष्ट्र एनसीसी एअर स्कॉडरन पुणे यांच्या वतीने त्याची निवड झाली आहे. 

       करण याचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथे झाले असून विवेकानंद जुनिअर कॉलेजचा तो माजी विद्यार्थी आहे. सध्या तो बीसीएससाठी एस. पी. कॉलेज पुणे येथे शिक्षण घेत आहे. सध्या तो कोल्हापूर येथे वास्तव्याला आहे. त्याचे वडील नंदकुमार गावडे हे कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत. सध्या पोलीस लाईन कसबा बावडा येथे राहत आहे. करण ला सेंट झेवियर चे शिक्षक अँथोनी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या निवडीबद्दल तुर्केवाडी  परिसर व चंदगड तालुक्यात कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment