डॉ. एन. एल. तरवाळ यांचेकडून बालचमूंना नववर्ष भेट, काय दिली भेट... - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2023

डॉ. एन. एल. तरवाळ यांचेकडून बालचमूंना नववर्ष भेट, काय दिली भेट...


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

दुंडगे (ता. चंदगड) येथील कुमार विद्या मंदीर च्या चिमुकल्यांना नववर्षाची भेट म्हणून पोर्टेबल स्पीकर-माइक सेट देण्यात आला.

डॉ. एन. एल. तरवाळ हे कुमार विद्या मंदीर चे माजी विद्यार्थी असुन सध्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. याआधी त्यांनी विद्यामंदीरच्या जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट कीटचे वाटप केलेले होते. डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन - कमवा आणि शिका योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रेक्टर म्हणुन काम करताना अनेक गरिब, होतकरू, अभ्यासू विद्यार्थ्यांना साहाय्य केले आहे.

यावेळी डॉ. एन. एल. तरवाळ यांचा मुख्याध्यापिका सुवर्णा आंबेवाडकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धचे असलेने आपले विद्यार्थी त्या स्पर्धेत टिकायला हवेत. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांन्ना विविध सुविधा देणे गरजेचे असुन माझ्याकडून हा पोर्टेबल स्पीकर- माइक सेट या बालचमुंना नववर्षाची भेट म्हणून देत आहे. याचा विविध प्रकारे अभ्यासात वापर करून आपल्या शाळेचे नाव लौकिक करावे. 

डॉ. तरवाळ यांनी आपले उदाहरण देऊन प्रतिकूल परिस्थितीशीवर मात करून उच्च धेय्य उराशी बाळगून जिद्दीने अभ्यास तसेच प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास ऊत्तुंग यश मिळवू शकता, असे विशद केले. तसेच विविध शास्त्रज्ञांनी केलेल्या वैज्ञानिक कार्यांचा दाखला देऊन विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची ओळख करून दिली आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करता येते, असा विश्वास दिला. विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच विविध प्रयोग करावेत, निरीक्षण करावीत आणि आपली विवेक बुद्धी जागृत ठेवून प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

श्री. रमेश कांबळे यांनी डॉ. तरवाळ व इतर पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच स्वागत केले. यावेळी दुंडगे गावचे नवनिर्वाचीत सरपंच चंद्रकांत आप्पाजी सनदी यांच्यासोबत शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सुनंदा बामणे, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, सदस्या अश्विनी खन्नुकर, जानवी पाटील, लक्ष्मण तरवाळ, अरुणा तरवाळ, अनुप्रिया तरवाळ, संतोष वडर, हरिष मंजाळी, अनिकेत तरवाळ, संतोष गुंजनाळी, रमेश नाईक, रामनाथ जाधव तसेच शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विनोद्कुमार चव्हाण, सागर खाडे, पांडूरंग पाटील या शिक्षकांंनी केले.No comments:

Post a Comment