वडिलांच्या पुण्यस्मरण दिनी वाचनालयास ग्रंथ पुस्तके भेट - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2023

वडिलांच्या पुण्यस्मरण दिनी वाचनालयास ग्रंथ पुस्तके भेट

कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट देताना विजय पाटील सोबत वाचनालयाचे पदाधिकारी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

          कालकुंद्री (ता. चंदगड) चे सुपुत्र व मुंबई पोलीस विजय पाटील यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम स्मृतीदिनी गावातील सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ पुस्तके भेट दिली. विजय पाटील यांनी वडिलांच्या स्मृतिदिनी इतर खर्चाला फाटा देत वाचनीय २० पुस्तके भेट देऊन वेगळा आदर्श घालून दिला आहे. याबद्दल त्यांचा  वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

        वाचनालयाचे अध्यक्ष के जे पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वागत पी. एस. कडोलकर यांनी केले. यावेळी झेविअर क्रुझ, डॉ प्रशांत दिंडे, अमृत पाटील, एस् के मुर्डेकर, नारायण पाटील, सागर बाजीराव पाटील, रणजीत पाटील, दीपक कालकुंद्रीकर, गजानन गावडू पाटील, विनायक पाटील, गजानन विठोबा पाटील, कल्लापा बागिलगेकर, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती. प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment