आजरा / सी. एल. वृतसेवा
निंगुडगे (ता. आजरा) येथे पंचायत समिती (शिक्षण विभाग) आजरा आणि राजाभाऊ केसरकर हायस्कूल व श्री बापूसाहेब सरदेसाई ज्यु. कॉलेज, निगुडगे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन सोमवार ते बुधवार अखेर तीन दिवस येथे होत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगराव देसाई असतील.
आजरा - चंदगड आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटन संभारंभास को. जि. मा. शी. पतसंस्थेचे अध्यक्ष दादा लाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबेकर, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील, बाळ डेळेकर, माजी सभापती उदय पवार, माजी जि. प. सदस्या सुनिता रेडेकर, माजी पं स. सदस्या वर्षा बागडी, को. जि. मा. शि चे संचालक सचिन शिंदे, श्रींकात पाटील, निंगुडगेचे सरपंच कृष्णा कुंभार, सरोळीचे सरपंच आकाराम देसाई, कोवाडचे सरपंच मनोहर जगदाळे, विस्तार अधिकारी सुनित चंद्रमणी, विलास पाटील आदी सह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment