नांदवडे येथे अज्ञात चोरट्यांकडून ५ घरांमध्ये तांब्याच्या घागरींची चोरी, घटनेची गावात चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2023

नांदवडे येथे अज्ञात चोरट्यांकडून ५ घरांमध्ये तांब्याच्या घागरींची चोरी, घटनेची गावात चर्चा

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       नांदवडे (ता. चंदगड) येथे अज्ञात चोरट्याकडून बुधवारी रात्री आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी उपयोगात येत असलेल्या तांब्याच्या घागरींची चोरी झाली. गावातील ५ व्यक्तींच्या घरी एकाच दिवशी चोरी झाल्याने आज दिवसभर नांदवडे गावामध्ये हा चर्चेचा विषय होता. यामध्ये अंदाजे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हि माहीती नांदवडे येथील दयानंद गावडे यांनी दिली. 

      पैसे, दागिणे, गाडी अशा वस्तुच्या चोरी झाल्याच्या घटना या सर्रास शहरी भागात घडतात. मात्र नांदवडे सारख्या ग्रामीण भागात तांब्याच्या हंड्याची चोरी झाल्याने भविष्यात मोठ्या चोऱ्या होवू शकतात याचे संकेत मिळाल्याचे या चोरीवरुन दिसते. त्यामुळे नागरीकांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. या चोरीबाबत मात्र आज दिवसभर नांदवडे गावामध्ये चर्चा सुरु होती.

       नांदवडे येथील सुधाकर ज्ञानोबा गावडे, कृष्णा गोपाळ गावडे, संतोष दत्तू मळवीकर, नामदेव तुकाराम गावडे, सखाराम दत्तू मळवीकर या नागरीकांच्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्याकडून समजते. यामध्ये अंदाजे सुमारे ५ नागरीकांचे एकूण २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment