कडलगे खुर्द येथील नदीपात्रात दहा फूट मगरीचे दर्शन, शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2023

कडलगे खुर्द येथील नदीपात्रात दहा फूट मगरीचे दर्शन, शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

कडलगे बुद्रुक येथे आठ दिवसापूर्वी दिसलेल्या मगरीचे पोलीस पाटील सागर कांबळे यांनी टिपलेले छायाचित्र

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      कडलगे खुर्द व कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदी  दरम्यान शिवनगे गावच्या दिशेला कडलगे खुर्द नदी घाटावर गुरुवारी दि. १९ रोजी सकाळी १० वाजता अंदाजे दहा फूट लांबीची मगर निदर्शनास आली. ढोलगरवाडी येथील वायरमन विनोद पाटील हे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारि दुरुस्तीसाठी गेले होते. 

       यावेळी त्यांच्या निदर्शनास सदर मगर आली. यावेळी गणपती पाटील, दत्तात्रय पाटील, नारायण पाटील, ज्ञानेश्वर पाटील यासह अन्य शेतकरी गेले होते. हीच मगर गत १० तारीखला कडलगे बुद्रुक येथील नवीन जॅकवेल शेजारी  कडलगे बुद्रुकचे पोलीसपाटील सागर कांबळे यांच्याही निदर्शनास आली होती. 

      तातडीने ढोलगरवाडीचे पोलीस पाटील राजेंद्रकुमार पाटील यांनी वनखाते, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना सदर वर्दी दिली आहे. परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. No comments:

Post a Comment