उत्तूरच्या त्रिवेणी पुरस्कारांचे रविवारी बहिरेवाडी येथे वितरण ! - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2023

उत्तूरच्या त्रिवेणी पुरस्कारांचे रविवारी बहिरेवाडी येथे वितरण !

आजरा  / सी. एल. वृतसेवा 

      उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रिडासंस्थेच्या वतीने रविवारी (२२ रोजी) गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक  स्मारक  बहिरेवाडी (ता. आजरा) येथे करण्यात आले आहे. गोकूळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे अध्यक्ष खाली हा कार्यक्रम होणार आहे. सांगली येथील जेष्ठ विचारवंत अविनाश सप्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

             राज्यस्तरीय  दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने व्यंकटराव हायस्कूल इंचलकरंजी येथील राजेंद्र अलोणे यांना गौरवण्यात येणार आहे. तर पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने वि. दि. शिंदे हायस्कूल गडहिंग्लजचे - डी. एम. चव्हाण, सिंबायोसिस स्कूल हरळी (ता. गडहिंग्लज) येथील  कविता कागिणकर, उत्तूर ता आजरा येथील केंद्र शाळेचे संतोष शिवणे कन्या विद्यामंदीर उत्तूरच्या निलिमा पाटील, विद्यामंदीर मुमेवाडी (ता. आजरा) येथील दिनकर खवरे, विवेकानंद हायस्कूल गडहिंग्लजचे पंडीत पाटील, चंदगड येथील अलबादेवी हायस्कूलचे सुनंदा बागे, महागोंड येथील ए. बी. दिवटे यांना गौरवण्यात येणार आहे.

           गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील बाबा आमटे व साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने अशोक मोहिते यांना गौरवण्यात येणार आहे.  त्रिवेणी जीवन गौरव पुरस्काराने  दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील बी. ए. संकपाळ, उत्तूर ता आजरा . येथील भिकाजी द. ढोणूक्षे, बळीराम पोतदार, गडहिंग्लज येथील अरुण कोटगी, आर्दाळ (ता. आजरा) येथील बी. एम. पाटील यांना गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती  संस्थेचे अध्यक्ष टी. के. पाटील व प्रा. श्रीकांत नाईक यांनी दिली.

No comments:

Post a Comment