चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात मोडी लिपीचे वर्ग सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2023

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात मोडी लिपीचे वर्ग सुरू

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील मोडी लिपीच्या पहिल्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला असून लवकरच मोडी प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या तुकडीची सुरुवात होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्र मार्फत हा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी प्रा. टी. एम. पाटील यांच्याशी संपर्क करावा.

         भ्रमणध्वनी क्रमांक ९४२१११२९९१ मर्यादित प्रवेश संख्या असल्याने त्वरित आपला संपर्क निश्चित करणे आवश्यक आहे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार असून संधीचे क्षेत्र उपलब्ध आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाकडे अनेकांचा ओघ वाढत आहे.

No comments:

Post a Comment