दहावी बारावीच्या परीक्षेत यावर्षी पूर्ण वेळ बैठे पथक हजर राहणार, परिक्षेदरम्यानचे गौरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाचे पाऊल..... - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2023

दहावी बारावीच्या परीक्षेत यावर्षी पूर्ण वेळ बैठे पथक हजर राहणार, परिक्षेदरम्यानचे गौरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाचे पाऊल.....

पुणे / विशेष प्रतिनिधी 

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनफेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावाची परीक्षा पार पडणार आहे. ज्यात बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान होणार असून, दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रांवर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचलली जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

      विशेष म्हणजे दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. गेल्यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठ्याप्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाले होते. काही ठिकाणी मुलांना बसण्यासाठी जागा नसल्याने शामियाना टाकून बसवण्यात आले होते. तर काही ठिकाणी विषय शिक्षकच मुलांना कॉपी पुरवत असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे औरंगाबादच्या या घटनांची दखल अधिवेशनात घेण्यात आली होती. त्यामुळे यंदा कॉपीसारख्या गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळातर्फे विशेष खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment