कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
अखिल भारतीय विद्यापीठ (साऊथ वेस्ट) मैदानी स्पर्धेसाठी कोवाड कॉलेजच्या सुशांत जेधे ५०००मी, ३००० मी, आणि प्राजक्ता शिंदे ५०००, १००००मी. धावणे साठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड करण्यात आली आहे. ९ ते १२ जानेवारीला फिजिकल एज्युकेशन युनिव्हर्सिटी तमिळनाडू चेन्नई तेथे या स्पर्धा होत आहेत.
विद्यापीठाचा ४५ खेळाडूंचा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला असून यासंघाचे मार्गदर्शक म्हणुन महविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आर. टी.पाटिल यांची निवड करण्यात आली आहे.या निवडी बद्दल सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे सचिव एम. व्ही. पाटिल, प्रा. एन. एस. पाटिल, प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी अभनंदन केले.
No comments:
Post a Comment