मराठी भाषेचे साहित्य व संस्कृतीचा आदर असावा : जेष्ठ विचारवंत अविनाश सप्रे, उत्तूरच्या त्रिवेणी पुरस्कारांचे बहिरेवाडी येथे वितरण ! - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2023

मराठी भाषेचे साहित्य व संस्कृतीचा आदर असावा : जेष्ठ विचारवंत अविनाश सप्रे, उत्तूरच्या त्रिवेणी पुरस्कारांचे बहिरेवाडी येथे वितरण !

 

उत्तूर ता आजरा येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार  स्विकारताना  दुंडगे ता . गडहिंग्लज बाळकृष्ण संकपाळ

आजरा  / सी. एल. वृतसेवा

     दक्षिणे कडील राज्ये ही आपल्या भाषेवर अधिक प्रेम करतात तसे महाराष्ट्रातील जनता ही मराठी भाषेला अधिक महत्व देत नाही. मराठी भाषेचे साहित्य व संस्कृतीचा आदर असावा असे प्रतिपादन उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रिडासंस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बहिरेवाडी (ता. आजरा) येथे बोलताना करण्यात जेष्ठ विचारवंत अविनाश सप्रे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रत्नजा सावंत होत्या.

उत्तूर येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार स्विकारताना बी. जी. पोतदार व भि. द . दोणूक्षे.

          अविनाश सप्रे म्हणाले, ``मराठी भाषेबाबत न्यूनगंड निर्माण करण्याची भावना समाजात रुढ झाली आहे. मराठी भाषेत असणारी वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वैचारिक पातळी घटत चालली आहे. विचारधारेचा अंत होत असून विचारांचे मंथन, संस्कार घडले पाहिजे. सध्याच्या राजकारण हे विक्षिप्त पणे सुरु आहे. राजकारणाला कोणताही आधार नाही. शिक्षणाचे बाजारीकरण थांबले पाहिजे.

   

उत्तूर येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार स्विकारताना अरुण बेनाडीकर

         यावेळी दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने व्यंकटराव हायस्कूल इंचलकरंजी येथील राजेंद्र अलोणे, पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्काराने वि. दि. शिंदे हायस्कूल गडहिंग्लजचे - डी. एम. चव्हाण, सिंबायोसिस स्कूल हरळी ता गडहिंग्लज येथील  कविता कागिणकर, उत्तूर (ता. आजरा) येथील केंद्र शाळेचे संतोंष शिवणे, कन्या विद्यामंदीर उत्तूरच्या  निलिमा पाटील, विद्यामंदीर मुमेवाडी (ता. आजरा) येथील दिनकर खवरे, विवेकानंद हायस्कूल गडहिंग्लज चे पंडीत पाटील, 

उत्तूर . ता आजरा . येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आर्दाळ ता आजरा . बाबुराव पाटील पुरस्कार स्विकारताना

         चंदगड येथील अलबादेवी हायस्कूलचे सुनंदा बागे, महागोंड हायस्कूल चे   ए. बी. दिवटे, बाबा आमटे व साधनाताई आमटे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील अशोक मोहिते त्रिवेणी जीवन गौरव पुरस्काराने  दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील बी. ए. संकपाळ, उत्तूर (ता. आजरा) येथील भिकाजी  ढोणूक्षे, बळीराम पोतदार गडहिंग्लज येथील  अरुण कोटगी, आर्दाळ (ता. आजरा) येथील बी. एम. पाटील यांना गौरवण्यात आले. यावेळी उत्तूरचे सरपंच किरण आमणगी, बहिरेवाडीच्या सरपंच रत्नजा सावंत आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. श्रींकात नाईक यांनी तर अजित उतूरकर यांनी सुत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment