कर्नाटक -महाराष्ट्र सिमा भागात मराठी भाषेच्या दुर्लक्षाकडे लक्ष देण्याची गरज : डॉ. जयसिंगराव पवार, आजरा येथे काँ. कृष्णा मेणसे यांना द. ना. गव्हाणकर पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2023

कर्नाटक -महाराष्ट्र सिमा भागात मराठी भाषेच्या दुर्लक्षाकडे लक्ष देण्याची गरज : डॉ. जयसिंगराव पवार, आजरा येथे काँ. कृष्णा मेणसे यांना द. ना. गव्हाणकर पुरस्कार प्रदान

 


आजरा / सी. एल. वृतसेवा

      महाराष्ट्र व कर्नाटकच्या  सिमा भागातील मराठी भाषा, संस्कृतीची नाशाकडे चालली आहे. यावर संशोधन झाले पाहिजे.  सिमा भागात मराठी भाषा व संस्कृतीचा ऱ्हास झाला असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

          जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व सिमा लढ्याचे नेते काँ. कृष्णा मेणसे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुरस्कार समितीचे रवींद्र आपटे होते.

         पवार म्हणाले, ``कारवारमध्ये १०० शाळा बंद पाडण्यात आल्या. परंतु महाराष्ट्रात यावर आवाज उठवला जात नाही. अण्णा भाऊ साठे व अमर शेख महाराष्ट्राला माहिती आहेत. परंतु गव्हाणकर वंचित राहिले. काँ. कृष्णा मेणसे यांनी तत्वाचे विचार सोडले नाहीत. गांधीवाद आणि साम्यवाद मानवतेकडे घेऊन जातात. खरं तर मेणसे सारख्या माणसांनी पुढच्या पिढीसाठीआत्मचरित्र लिहिले पाहिजे. कारण अशी माणसे होणार नाहीत. ९६ व्या वर्षी सुद्धा मेणसे मजबूत आहेत.

           सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना  काँ. मेणसे म्हणाले, ``महात्मा गांधी, क्रातीसिंह नाना पाटील यांच्या सोबत काम केले. गव्हाणकर, अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांच्या पोवाड्यानंतर सभा होत असे. ती अद्वितीय माणसे होती. १९५६साली सिमा प्रश्नाचा लढा सुरू झाला. ११महिने कारावास भोगला.

 चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश अबिटकर, रवींद्र आपटे यांची भाषणे झाली. यावेळी मेणसे यांनी पुरस्काराची रक्कम समितीला दिली.

             याप्रसंगी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोकूळच्या संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, कारखाना अध्यक्ष सुनिल शिंत्रे, प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, माजी सभापती रचना होलम, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, एम. के. जाधव, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

           स्वागत समिती सदस्य मुकुंदराव देसाई यांनी केले.प्रास्ताविक काँ.संपत देसाई यांनी केले.सूत्रसंचालन अशोक शिवणे यांनी केले.मानपत्र वाचन संजय घाटगे यांनी केले.अनिकेत चराटी यांनी आभार मानले.






No comments:

Post a Comment