दाटे येथील कृषीमाल फलोत्पादन संघ नाचना खरेदीत महाराष्ट्रात अव्वल - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2023

दाटे येथील कृषीमाल फलोत्पादन संघ नाचना खरेदीत महाराष्ट्रात अव्वल

उदयकुमार देशपांडे


चंदगड/प्रतिनिधी
शासनाच्या आधारभूत  किंमत खरेदी योजने अंतर्गत भरड धान्य खरेदीमध्ये सन २०२१-२२ या वर्षात दाटे येथील चंदगड तालुका कृषिमाल  फलो. सह खरेदी विक्री संघाने नाचणा(रागी) खरेदीमध्ये उत्कृष्ट काम करून महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक  मिळवला आहे. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र स्टेट माक्रेटिंग फेडरेशनच्या जनरल सभेमध्ये चंदगड तालुका कृषिमाल फलो. सह खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितित मुंबई  येथे मंगळवार दि.२४/०१/२०२३ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान सभागृहात सत्कार आयोजित केला आहे.


No comments:

Post a Comment