जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन होय -नितीन पाटील,तालुकास्तरीय हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2023

जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन होय -नितीन पाटील,तालुकास्तरीय हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

"वाचन हा एक छंद आहे तो जोपासला तर सुखी जीवनाचा मार्ग सापडेल. अनेक संकटावर मात करण्याच्या वाटा वाचनाच्या महामार्गावर सापडतात ,म्हणूनच जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन होय. " असे प्रतिपादन बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांनी केले .मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय हस्ताक्षर व निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन पाटील बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे होते .प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय एम .एन .शेवगेकर यांनी करून दिला यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी मुलांच्या सुप्त गुणाना वाव देण्यासाठी मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. 

बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते प्रा. शिवाजी मोहणगेकर यांना चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवि पाटील, देविका बल्लाळ, एस.एल. बेळगावकर यांची मनोगते झाली. कार्यक्रमाला  व्ही.एल. सुतार, फिरोज मुल्ला, प्रा.शाहू गावडे, डी.व्ही. पाटील,प्रेमा पवार, नेत्रा पाटील, बल्लाळ मॅडम ,राजेंद्र शिवणगेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच.आर. पाऊसकर तर आभार बी.एन. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment