कुदनुर येथे तलावात पडून महिलेचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2023

कुदनुर येथे तलावात पडून महिलेचा मृत्यू


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

            कुदनुर (ता. चंदगड) मेन रोड येथील रहिवासी सुनीता सुरेश कुंभार (वय ५०)  यांचा मंगळवार दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी घराशेजारी असणाऱ्या कलमेश्वर तलावात पडून मृत्यू झाला. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास चंदगड पोलीस ठाण्याचे श्री. कसेकर करत आहेत. चंदगड येथे पोस्टमार्टम करून सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुनिता कुंभार यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा कुदनुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, जावई असा परिवार आहे. निवृत्त प्राथमिक शिक्षक सुरेश कुंभार यांच्या त्या पत्नी होत.No comments:

Post a Comment