तालुका कृषी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक शंकरराव सावंत यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2023

तालुका कृषी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक शंकरराव सावंत यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
    चंदगड येथील तालुका कृषी कार्यालयांतील वरिष्ठ लिपिक शंकरराव कृष्णराव सांवत हे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा उपविभागीय कृषी अधिकारी सतीश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली सपत्नीक सत्कार करण्यात आला. 
      प्रारंभी प्रस्ताविक कृषी सहाय्यक किरण पाटील यांनी केले. श्री. सावंत यांनी नोकरीच्या ४० वर्षाच्या कालावधीत इमाने इतबारे सेवा दिली. कामसू, प्रामाणिकपणा आणि शिकण्याची वृती अंगी बाळगल्याने त्यानी  चाळीस वर्षाची  यशस्वी सेवा दिली. सेवेत असताना प्रामाणिकपणे काम कसे करावे याचा आदर्श इतर कर्मचारीवर्गाने घ्यावा असे उपविभागीय कृषी अधिकारी सतीश रोकडे सांगितले. यावेळी सत्कारमूर्ती शंकरराव सावंत यानीही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कृषी विभागात चाळीस वर्षाची सेवा देता आल्याचे सांगितले. 
     चंदगड मंडल कृषी अधिकारी विजय गभरे,वरिष्ठ लिपिक सतीश केसरकर,  सरिता तोडकर, श्रीराम भोगण, रत्नमाला वाडेकर, सतीश कुंभार, कृषी पर्यवेक्षक महेश सोयाम, अभिजीत गावडे, विष्णु सुतार  यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आभार प्रल्हाद केंद्रे यांनी मानले.


No comments:

Post a Comment