अनिरुद्ध रेडेकर 'बाळासाहेबांची शिवसेना पक्षात, गडहिंग्लज उपविभागात राजकीय उलथापालथ - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2023

अनिरुद्ध रेडेकर 'बाळासाहेबांची शिवसेना पक्षात, गडहिंग्लज उपविभागात राजकीय उलथापालथ


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

९० च्या दशकातील हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक कै. केदारी रेडेकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध केदारी रेडेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नुकताच जाहीर प्रवेश केला. लागलीच त्यांची कोल्हापूर उप जिल्हाप्रमुख पदी निवड करून निवडीचे पत्र देत पक्षात स्वागत आले. मुंबई येथील प्रवेश प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव किरण पावसकर व सुशांत शेलार जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, शाखाप्रमुख संतोष शिंदे, सुरज गवळी, लक्ष्मण लाड, सचिन राऊत, विजय नवलगुंदी , अतुल शिंगे, प्रमोद खेडेकर, सुशांत मुरूकुटे, शिवाजी चव्हाण, अक्षय पाटील आदींची उपस्थिती होती.

      गेल्या काही वर्षात विविध माध्यमातून अनिरुद्ध रेडेकर यांचे सामाजिक कार्य उठावदार ठरले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज उपविभागात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला बळकटी प्राप्त होईल अशी चर्चा होताना दिसते.
No comments:

Post a Comment