डोणेवाडीत टस्कराने बुडवली प्रवाशी नौका, अनेक विदयुत मोटरींचेही केले नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2023

डोणेवाडीत टस्कराने बुडवली प्रवाशी नौका, अनेक विदयुत मोटरींचेही केले नुकसान

संग्रहित छायाचित्र

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

गेली अनेक दशके नेसरीला घटप्रभा नदीतून पलिकडे जाण्यासाठी आधार असलेली डोणेवाडी (ता. गडहिंग्लज) ची नदितील प्रवाशी नौकेला जंगली टस्कराने पलटी करून बुडवली. यामध्ये टस्कराकडून नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. टस्कराने या नावेबरोबरच नदिमध्ये प्लास्टीक बॅरलवर असणाऱ्या अनेक मोटारींचे बॅरलही फोडून टाकले. यानंतर हा टस्कर नेसरी हद्दीतून तळेवाडी मार्गे मार्गस्थ झाले.  डोणेवाडी चे सरपंच सिकंदर मुल्ला - उपसरपंच रंगराव नाईक, पोलिस पाटील रमेश नाईक, ग्राम सेवक पी. एस. पाटील' इकबाल कदिम, हुसेन जमादार, दिनकर फगरे, आण्णा फगरे इस्माइल वाटंगी आदिनी अथक परिश्रम करून बुडालेली नाव ट्रॅक्टर च्या साह्याने बाहेर काढली घटना स्थळी आजरा वनविभागाच्या कर्मच्याऱ्यानी भेट दिली.

No comments:

Post a Comment