चित्रकला स्पर्धेत उत्तूर विद्यालयाचा १००% टक्के निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2023

चित्रकला स्पर्धेत उत्तूर विद्यालयाचा १००% टक्के निकाल

 


आजरा / सी. एल. वृतसेवा

         सप्टेंबर २०२२मध्ये झालेल्या शासकीय चित्रकला परीक्षेमध्ये उत्तूर विद्यालय उत्तूर (ता. आजरा) येथील  एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा या दोन्ही परीक्षेमध्ये शंभर टक्के निकाल लागला आहे. 

           इंटरमिजीएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये  चिन्मय युवराज गंगापुरे  व श्वेता श्रीकृष्ण मगदूम यांनी  "ए" ग्रेड मिळवला  आहे. संचित सुभाष धुरे, शरयू संतोष, जाधव,  यांनी "बी"  ग्रेड मिळवला  आहे. 

        एलिमेंट्री चित्रकला  ग्रेड परीक्षेचा  शंभर टक्के निकाल लागलेला आहे. यामध्ये अथर्व साताप्पा पोवोर हर्षाली शिवाजी मनीवडर, अपूर्वा ज्योतिबा सावंत, समीर भाऊसाहेब आजगेकर यांना प्रत्येकी "बी" ग्रेड मिळवला  आहे. याकामी  कलाशिक्षक इंद्रजीत बंदसोडे य. प्राचार्य  शैलेंद्र आमणगी यांचे मार्गदर्शन मिळाले.

No comments:

Post a Comment