चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बागिलगे सह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री रवळनाथ देवालयाचा वार्षिक यात्रोत्सव शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोरोनानंतर दोन वर्षांन होणाऱ्या या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असणार आहे. बागिलगेसह डुक्करवाडी, तांबूळवाडी, मजरे जट्टेवाडी, मौजे जट्टेवाडी, नरेवाडी, गुडेवाडी, धु मडेवाडी आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान मंगळवार दि.३१जानेवारी रोजी महालक्ष्मीयात्रा होणार आहे. या यात्रेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन सरपंच नरसू पाटील (बागिलगे) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment