सुंडीच्या संत तुकाराम हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2023

सुंडीच्या संत तुकाराम हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून देणगी



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    सुंडी (ता. चंदगड) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव संचलित संत तुकाराम हायस्कूलला माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक उठावातंर्गत देणगी देणगी देण्यात आली. ७४ व्या  प्रजासत्ताक दिनानिमित्त, कृतज्ञता समारंभ व सन २०२०-२१ च्या इयत्ता १० वी मधील माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा असा संयुक्त कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. डी. घोळसे होते. ध्वजारोहण शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त मुख्याध्यापक झिमाना निंगापा पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन. एम. पाटील होते. 

        प्रारंभी प्रास्ताविक व्ही. एस. पाटील यांनी केले. यावेळी शाळेला ध्वजस्तंभ उभारणीसाठी दुबई येथील सिव्हिल इंजिनिअर निंगापा झिमाणा पाटील यानी ४० हजार रूपये देणगी दिली. तर विद्यालयाचा नामफलक माऊली ट्रॅव्हल्स मालक शिवाजी पुंडलिक मोर्ये यांनी दिला. याप्रसंगी झिमाना पाटील व त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना पाटील तसेच शिवाजी  मोर्ये यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांनी रोख रू ५००० देणगी शाळेसाठी दिली त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक घोळसे, पी. एस. पाटील व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला सरपंच मनोहर कृष्णा कांबळे,उपसरपंच सौ शुभांगी धानाप्पा पाटील, सदस्या सौ. निता निवृत्ती पाटील, संजीवनी संजय पाटील, तानाजी नारायण टक्केकर, सदाशिव बंडोपंत देसाई, ऑ.कॅप्टन तुकाराम यल्लापा कांबळे, धुळापा सरशेट्टी, पोलिस पाटील वैजनाथ सरशेट्टी, भाग्यलक्ष्मी दूध संस्था माजी अध्यक्ष  विष्णूपंत दत्तात्रय पाटील यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, वाळकेश्र्वर सेवा सोसायटी संचालक मंडळ, आजी माजी जवान, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन बी. व्ही. केसरकर यांनी केले तर एम. के. भुजबळ यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment