चंदगड येथील रवळनाथ देवाची ८ फेब्रुवारीला यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2023

चंदगड येथील रवळनाथ देवाची ८ फेब्रुवारीला यात्रा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           चंदगडचे ग्रामदैवत श्री रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रा मंगळवार दि. ७ ते १२ फेब्रुवारी अखेर होणार असल्याची माहिती देव रवळनाथ ट्रस्टचे सचिव आबासाहेब देसाई यांनी दिली. यात्रेनिमित्त गावामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. तसेच मंदिर ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव रवळनाथ पब्लिक ट्रस्ट, चंदगड या गावची लक्ष्मी यात्रा मंगळवार दि. ३१ जानेवारी व बुधवार दि. १ रोजी गदगेची लक्ष्मी तसेच श्री देव रवळनाथ वार्षिक यात्रा फेब्रुवारी सालाबादप्रमाणे दि. ७ फेब्रुवारी ते १२फेब्रुवारी पर्यंत  आहे. मंगळवार दि. ७ रोजी लघुरूद्र, अभिषेक, गोंधळ, महाप्रसाद, रात्री गोंधळाची आरती, बुधवार दि. ८ रोजी उत्सवाचा मुख्य दिवस, महाआरती, पालखी, सासनकाठी, गुरूवार दि. ९ रोजी देव चाळोबा यात्रा, शुक्रवार दि. १० रोजी देवी सातेरी, भावेश्वरी यात्रा, शनिवार दि. ११ रोजी श्री देवी ईठलाई यात्रा, रविवार दि. १२ रोजी जुन्या हरक्या फेडणे, असा कार्यक्रम होणार असून भाविकांनी लाभ घ्यावा, यात्रेचा असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment