आजरा / सी. एल. वृतसेवा
उत्तूर ता आजरा येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून सदस्य पदाचा राजीनामा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे राजीनामा दिला आहे . पत्रकार परिषेदत त्यांनी आजरा येथे माहिती दिली .
.. निवेदनात असे म्हटले आहे की ,कै. मुकुंदराव आपटे सन १९६५ पासून राष्ट्रीय कॉग्रेस पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. या कालावधीत उत्तूरच्या सरपंचपदासह जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी १४ वर्ष राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे नेतृत्व केले होते. आपण २७ वर्षे राष्ट्रीय कॉग्रेस पक्षामध्ये कार्यरत होतो .. राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून १० वर्षे पंचायत समिती सदस्य, १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य पदावर काम केले आहे. माझ्या पत्नी सौ. वैशाली आपटे यांनी गेली ५ वर्षे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून उत्तूरचे थेट सरपंचपद भूषविले आहे. मी व माझे सर्व आपटे कुटुंब आज अखेर पर्यंत राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे काम करीत आहोत तसेच माझ्या सोबत मतदार संघातील २२ गावात माझ्या कार्यकर्त्यानी, सहकार्यानी व वडिल्याच्या सोबत काम केलेल्या सहकार्यांनी राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष वाढवण्याचे काम केले आहे.या कालावधीत उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष सर्वसामान्यांपर्यंत तसेच तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम मी व माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे. राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाने मला भरपूर पदे दिली. त्याचबरोबरच मी ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी २७ वर्ष कार्य केले आहे. पण आता राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना मला अनेक समस्या येत आहेत. माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे मी पूर्णवेळ पक्ष्याचे काम करू शकत नाही .माझ्यामुळे राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाला कोणतीही समस्या, अडचण येऊ नये, याकरिता आजपासून राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यपदासह सर्व पदांचा मी राजीनामा देत असल्याचे आपटे यांनी निवेदनात नमूद केले आहे . आपटे यांनी पुढची कारकिर्द वाटचाल गुलदस्तात ठेवली असून नेमके काय करणार यांची राजकीय स्तरावर चर्चा सुरु आहे .
No comments:
Post a Comment