राजकिय प्रवासात सत्याची कास धरली म्हणून समाजकार्य करण्यात यशस्वी झालो - भरमुआण्णा पाटील, चंदगड येथे ८७वा वाढदिवस साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2023

राजकिय प्रवासात सत्याची कास धरली म्हणून समाजकार्य करण्यात यशस्वी झालो - भरमुआण्णा पाटील, चंदगड येथे ८७वा वाढदिवस साजरा


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
माझ्या आजपर्यंतच्या राजकिय प्रवासात सत्याची कास धरली. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणत आलो म्हणूनच राजकारणातुन समाजकार्य करण्यात मी यशस्वी झालो. राजकरणात नैतिकता असावी लागते आणि ती नैतिकता प्रत्येकाने सांभाळली पाहिजे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांनी व्यक्त केलं. चंदगड तालुका भाजपाच्या वतीने भरमूआण्णा यांचा ८७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.अध्थक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील होते. चंदगड येथील सोयरीक मंगल कार्यालयात वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रारंभी प्रास्ताविक अनिल शिवणगेकर यानी केले. यावेळी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील उपस्थित होते.आम. राजेश पाटील यांनी भरमुआण्णा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
   भरमुअण्णा पुढे म्हणाले की,.चंदगड तालुक्यात हरितकांती आणली. माझ्याकडे संपत्ती नाही, माझी धन-दौलत म्हणजे  गोरगरीब जनताच .सर्वसामान्य  माणसांना न्याय मिळवून दिला तर तो माणूस खऱ्या अर्थाने समाजाच्या मनात स्थान मिळवतो. डोंगर-दर्यातील भागामध्ये जाण्यासाठी रस्ते केले, दूध संस्था,सेवा संस्था,पतसंस्थां काढून दिल्या. सामान्य कार्यकर्ता मग तो कोणत्याही जाती धर्माचा असूदे त्याला उभं केलं. शाहू, फूले, आंबेडकरांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून तालुक्याच्या विकासासाठी काम केलं. कधी कुठली अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळे माझी खरी संपती ही तालुक्यातील माझे कार्यकर्ते आणि सामान्य जनता आहे.त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या जनतेच्या उपयोगी पडणार अशी ग्वाहीही दिली.
        यावेळी गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, आजरा साखर कारखाना चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे,प्रा.आर.पी पाटील अँड संतोष मळवीकर, एम.टी.कांबळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर,
आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती शांताराम पाटील,बबनराव देसाई, नामदेव कांबळे,मोहन परब,माजी जि.प.सदस्य सचिन बल्लाळ, उदयकुमार देशपांडे,सुधीर देशपांडे,शामराव बेनके,ज्योतीताई पाटील, दिपक पाटील,सुरेश सातवणेकर,प्रताप सुर्यवंशी,गंगाधर पाटील,डाॅ परशराम गावडे, रामा पाटील,आर.व्ही.ढेरे आदी मान्यवरांसह चंदगड तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केले तर आभार सचिन बल्लाळ यांनी मानले. 

सरपंचांना मिळणार ५० लाखांचा निधी
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष नामदेव पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या आधी दिलेला ५० लाखांचा शब्द भारतीय जनता पार्टी पूर्ण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जे जे भारतीय जनता पक्षाचे सरपंच निवडून आलेत त्यांना लवकरच ५० लाखांच्या निधीचा धनादेश दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने दिली.


No comments:

Post a Comment