स्वच्छ शाळा, सुंदर परिसर पुरस्काराने चंदगड येथील फादर अग्नेल स्कूल सन्मानित, विविध स्पर्धेमध्येही स्कुलचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2023

स्वच्छ शाळा, सुंदर परिसर पुरस्काराने चंदगड येथील फादर अग्नेल स्कूल सन्मानित, विविध स्पर्धेमध्येही स्कुलचे यश

नगरपंचायतीच्या वतीने पुरस्कार स्विकारताना फादर अग्नेल स्कूलचे शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड नगरपंचायतीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नगरपंचायतीच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत परिसरातील शाळांचा सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये सर्वांत स्वच्छ, सुंदर शाळा व स्वच्छ सुंदर परिसर या स्पर्धेमध्ये चंदगड येथील फादर अग्नेल  स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल स्कुलला नगरपंचायतीच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 

      शाळेत प्रत्येक वर्गात कचराकुंडीचे बकेट ठेवण्यात आले आहेत. ओला  कचरा, सुका  कचरा असे विभाजन  ही करण्यात येते. या अनुषंगाने शाळांचा सर्वे करून वारंवार टिप्पणी ठेवून अंतिम निकाल काढण्यात आले होते. त्यामध्ये फादर अग्नेल स्कूल प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. 

    याशिवाय नगरपंचायत आयोजित पथनाट्य स्पर्धेत ही फादर अग्नेल स्कूलने `जागर स्वच्छतेचा तुमच्या आमच्या हिताचा` या विषयाला अनुसरून पथनाट्य सादर केले. त्यामध्ये शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. जिया पिरजादे या विद्यार्थिनीने नगरपंचायत अंतर्गत घेण्यात आलेल्या पेंटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक व रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. गायत्री शिरोडकर या विद्यार्थिनीने पेंटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर घोषित पिळणकर या विद्यार्थ्यांने लहान गट मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. या पुरस्कारांचे वितरण २ जानेवारी 2022 रोजी  नगरपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आले. 

      नगरपंचायतीने ठेवलेल्या अशा अनेक स्पर्धेत फादर अग्नेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल यांनी अभिनंदन केले. चंदगडच्या नगराध्यक्षा  प्राची काणेकर, नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायतीचे अधिकारी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment