चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मरणोत्तर नेत्रदान चळवळीतर्फे चंदगड तालुक्यातील अंधांसाठी मोफत स्वयंसिद्धता कार्यशाळा होणार आहे. बुधवार व गुरुवारी (ता.१ व २) दोन दिवस कार्वे (ता.चंदगड) येथील मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ही कार्यशाळा चालेल. त्यासाठी येथील पंचायत समिती आरोग्य विभागाचे सहकार्य मिळाले आहे.
अंधांनी पांढरी काठी कशी वापरावी, दिशा कशा ओळखायच्या, स्नायूंची लवचिकता वाढविण्यासाठी व्यायाम प्रकार, ज्ञानेंद्रियांचा सक्षमपणे वापर कसा करावा यासह दैनंदिन जीवनात वावरताना येणाऱ्या विविध अडचणींवर मात कशी करावी याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. अंधांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते स्वागत थोरात (मुंबई) व स्वरुपा देशपांडे (पुणे) मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी गडहिंग्लज येथील अंकूर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलतर्फे अंधांची नेत्र तपासणी केली जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अंधांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment