![]() |
श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरला 'स्वच्छ सुंदर शाळा' पुरस्कार प्रदान करताना माजी शिक्षणाधिकारी श्री पाच्छापूरे |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगावच्या श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूरला सन २०२२ - २३ सालचा 'स्वच्छ सुंदर व हिरवी शाळा' पुरस्कार नुकताच गडहिंग्लज येथे प्रदान करण्यात आला.
गडहिंग्लज तालूका मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मण पाश्चापुरे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी. जी. काटे, प. स. गट शिक्षणाधिकारी नवल कुमार हलबागोळ, उपशिक्षणाधिकारी श्री. टोणपे आदि मान्यवरांच्या हस्ते श्री शिवशक्ती हायस्कूलचे प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्याकडे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बी. जी.काटे, के. बी. पोवार, आर. वाय. पाटील, व्ही. एस. घुगरे आदि मान्यवर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment