श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवणगेमध्ये हळदी कुंकू समारंभ आणि माता पालक मेळावा उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2023

श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवणगेमध्ये हळदी कुंकू समारंभ आणि माता पालक मेळावा उत्साहात संपन्न

 

महिलांना मार्गदशन करताना सौ. माधुरी सावंत भोसले

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        शिवनगे (ता. चंदगड) येथील श्री ताम्रपर्णी विद्यालयामध्ये हळदी कुंकू समारंभ आणि माता पालक मेळावा  मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या आणि वक्त्या म्हणून उत्साळी गावच्या सरपंच सौ. माधुरी संतोष सावंत-भोसले उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी शिवनगेचे माजी सरपंच सौ. विजया अरुण पाटील होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पवार यांनी केले. 

        कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. या वेळी महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. काही महिलांनी उखाणे घेतले तर काही महिलांनी गाणी सादर केली. काहींनी गोष्टी सांगितल्या. याप्रसंगी हळदी कुंकू देऊन वाण देण्यात आले.

     या कार्यक्रमाला शिवनगे, लाकिकट्टे, माणगाव आणि माणगाववाडी गावातील १२०  महीला उपस्थित होत्या. मुख्याध्यापक डी. जे. पाटील  यांनीही मार्गदर्शनकेले. आभार पी. ए. केंगरे यानी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एल. एस. कोकितकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षीकांनी आणि सर्व सेवकांनी परिश्रम घेतले. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. जे. पाटील,  पी. एस. सावगावे, आर. एम. बोकडे, आर. एम. बालेशगोळ,  ए.  ई. सुतार, पी. एम. पवार, स्नेहल पाटील  व सर्व सेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment