कुरणी येथे आयोजित मुलींच्या खो-खो स्पर्धेत सरोळी प्राथमिक शाळा अजिंक्य - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2023

कुरणी येथे आयोजित मुलींच्या खो-खो स्पर्धेत सरोळी प्राथमिक शाळा अजिंक्य

कुरणी येथे आयोजित मुलींच्या खो खो स्पर्धेतील विजयी संघ

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालूक्यातील कुरणी येथे प्रथमच मुलींच्या खो-खो  स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्या मंदिर सरोळी च्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.

      रवळनाथ ट्रॅक फौंडेशन कुरणी च्या वतीने आयोजित केलेल्या १ ली ते ७ वी च्या प्राथमिक शाळेतील मुलींच्या खो-खो स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. तालुक्यातील विविध शाळेतील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये सोनारवाडी, कानुर, सरोळी, जांबरे, कुरणी, बुझवडेच्या संघांनी नेत्रदिपक खेळाचे दर्शन दिले. अतिशय चुरशीचे सामने यावेळी पाहायला मिळाले. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

 या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

 प्रथम क्रमांक- वि. मं. सरोळी =‌ 5001=रु आणि चषक

द्वितीय क्रमांक-वि. मं. कुरणी = 3001=रू आणि चषक

तृतीय क्रमांक- वि. मं. जांबरे = 2001=रु आणि चषक

       तसेच उत्कृष्ट कोच म्हणून १.विशाल शांताराम कांबळे (बुझवडे ) श्री भोगन  (सरोळी ) यांना गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी  मारुती सावंत(आर्मी ऑफिसर कुरणी), P. K. Group चंदगड, अनंत पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांनी मोलाचे सहकार्य केले. 

          स्पर्धेचे संयोजक विशाल शांताराम कांबळे (बुझवडे) आणि रवळनाथ ट्रॅक फौंडेशन कुरणी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुरणी शाळेचे मुख्याध्यापक  प्रवीण मधुकर साळुंखे, श्री नागरगोजे, श्री. गावडे, शालेय व्यवस्थापन कमिटी, विठोबा गावडे, अर्जुन पाटील व कुरणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment