कोवाड येथील दि मर्चंट पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दयानंद मोटूरे,उपाध्यक्षपदी उत्तम मुळीक यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2023

कोवाड येथील दि मर्चंट पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दयानंद मोटूरे,उपाध्यक्षपदी उत्तम मुळीक यांची निवड

 

दयानंद मोटूरे                   उत्तम मुळीक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         कोवाड (ता. चंदगड) येथील दि कोवाड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दयानंद नारायण मोटूरे किणी व उपाध्यक्षपदी उत्तम विठ्ठल मुळीक कोवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी एम. व्ही. पाटील होते. यावेळी श्री. मोटुरे यांचा सत्कार बी. के. पाटील व उपाध्यक्ष उत्तम मुळीक यांचा सत्कार राणबा तोगले यांच्या हस्ते करण्यात आला. संचालक बी. के. पाटील, राणबा तोगले, बाळासाहेब वांद्रे, कल्याप्पा वांद्रे, झाकीर काझी, विष्णुपंत गावडे, कृष्णा कांबळे, रवि पाटील, विरुपाक्ष गणाचारी, संचालिका गीतांजली अंगडी, सौ. मनीषा पाटील उपस्थित होते. सभासद व संचालक मंडळाच्या विश्वासास पात्र राहुन संस्थेच्या प्रगतीत योगदान देऊ असे निवडी नंतर नूतन अध्यक्ष मोटूरे व उपाध्यक्ष मुळीक यानी  सांगितले. आभार सचिव पुंडलिक पाटील होते.

No comments:

Post a Comment