महाराष्ट्र - कर्नाटक सीमा जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर पडणार पहिल्यांदाच डांबर - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2023

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर पडणार पहिल्यांदाच डांबर

 

रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना दिव्यांग सेल अध्यक्ष राजाराम जाधव

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       अनेक वर्षापासून महाराष्ट्र - कर्नाटक या राज्यांतील सीमेवरील देवरवाडी आणि कोनेवाडी (ता. चंदगड) या गावांमधील दुवा ठरणारा रस्ता अनेक वर्षापासून खाच खळग्यानी भरलेला होता. वर्दळीच्या असणाऱ्या व महाराष्ट्र - कर्नाटक राज्याना जोडणाऱ्या या रस्त्या कडे दोन्ही राज्य शासनाचे आजपर्यंत याकडे दुर्लक्ष होते. महाराष्ट्र सीमा भागातून अनेक शेतकरी वर्ग तसेच शिनोळी औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे कामगार वर्ग यांना पावसाच्या दिवसात या रस्त्यावरून जाताना  तारेवरची कसरत करावी लागत होती. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून या रस्त्याचे काम मार्गी लागले. 

        या कामाचे उदघाटन राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत देवरवाडीचे सदस्य राजाराम जाधव यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बसवंत कांबळे, क्रांती दीपक सुतार, जयश्री करडे, माजी उपसरपंच मनोहर सिद्धार्थ, देवरवाडी दूध डेअरीचे नवनिर्वाचित संचालक शशिकांत जाधव, गोपाळ आडाव, वैजनाथ देवस्थान कमिटी अध्यक्ष नारायण भोगण खजिनदार बाळाराम करडे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार अडाव, बाळाराम भोगण, केदारी आंदोचे संदीप जाधव, महादेव आडाव, बसवराज पुजारी तसेच कोणेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य मोणाप्पा पाटील, निंगो कंग्राळकर व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दोन्ही गावातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment