तुडये येथून विवाहिता बेपत्ता, पतीकडून पोलिसात तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2023

तुडये येथून विवाहिता बेपत्ता, पतीकडून पोलिसात तक्रार

सौ. कीर्ती राहुल हुलजी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         तुडये (ता. चंदगड) येथून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार विवाहितेचे पती राहुल विनायक हुलजी यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. सौ. कीर्ती राहुल हुलजी (वय-१९, रा. तुडये, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे बेपत्ता विवाहित महिलेचे नाव आहे. दिनांक 15/01/2023 रोजी पहाटे 05.00 वाले 05.30 वाजण्याच्या दरम्यान मुदतीत घरात कोणास काही न सांगता कोठेतरी निघुन गेली आहे. 

       यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहिती अशी - सौ. किर्ती या १५ जानेवारी २०२३ पासून घरातून बेपत्ता आहेत. विवाहितेचे वर्णन खालीलप्रमाणे - रंगाने निमगोरी, उंची 5.3 इंच, नाक सरळ, केस काळे लांब, कपाळावर टिकलीचे गोंदण, अंगात गुलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीन्स, राखाडी रंगाचे जॅकेट, कानात साधी कर्णफुले, पायात पैंजण व गुलाबी रंगाची सॅन्डल, मराठी व हिंदी भाषा स्पष्ट बोलते. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. अशा वर्णनाची महिला आढळल्यास चंदगड पोलिस ठाणे यांच्याशी ०२३२०२२४१३३ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment