![]() |
| भरत कुंडल |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
चन्नेहट्टी, राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस शुगर्सने चालू गळीत हंगामात 74 दिवसांमध्ये 3 लाख 60 हजार टन इतका ऊस गाळप केला असून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ची सर्व बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केली आहेत. अशी माहिती हेमरस शुगरचे युनिट बिजनेस हेड भरत कुंडल व मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. सदर साखर कारखाना सर्वाधिक दर देण्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चौथा क्रमांक लागतो. देशात सर्वात पहिला या कारखान्याने 3008 रु. प्रति टन एकरकमी एफ. आर. पी. जाहीर करून आदर्श निर्माण केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनुक्रमे बिद्री साखर कारखाना 3100, त्यानंतर दालमिया शुगर 3036 त्यानंतर वारणा शुगर 3025, हेमरस शुगर्स 3008 असा चौथ्या क्रमांकावर दर देण्यात येत आहे. आगामी काळात ऊस गाळपचे नेटके नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment