तावरेवाडी मराठी शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून साऊंड सिस्टीम भेट - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2023

तावरेवाडी मराठी शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून साऊंड सिस्टीम भेटचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          तावरेवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या हलकर्णी नाईक वसाहतीतील (ता. चंदगड) प्राथमिक शाळेत अध्यापक म्हणून कार्यरत असलेले संभाजी संभाजी काळोजी खणगुतकर यांनी गावच्या शाळेसाठी पोर्टेबल स्पीकर व माईक, साऊंड सिस्टिम भेट दिली. 

        सौ. संजीवनी संभाजी खणगुतकर यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील यांच्याकडे ही साऊंड सिस्टीम सुपूर्द करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. माधुरी कागणकर, शालेय कमिटी अध्यक्ष  गौतम आवडण, उपाध्यक्षा सौ अमृता खणगुतकर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. शुभांगी कागणकर, सौ. अश्विनी कुद्रेमानकर, राम कागणकर, केदारी कागणकर, उत्तम हसबे, तसेच गावचे पोलीस पाटील काशिनाथ कागणकर, तंटामुक्त अध्यक्ष मारुती कागणकर आदीसह पालक विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. आभार दिपक मनगुतकर यांनी मानले.No comments:

Post a Comment