माणकेश्वर वाचनालयामार्फत दहावी विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेची हलकर्णीत सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2023

माणकेश्वर वाचनालयामार्फत दहावी विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेची हलकर्णीत सुरवात

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     माणगाव (ता. चंदगड) येथील श्री माणकेश्वर सार्वजनिक मोफत वाचनालया मार्फत इयत्ता १० वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

         जानेवारी महिन्यातील प्रत्येक रविवारी हलकर्णी केंद्रीय प्राथमिक शाळा हलकर्णी येथे इयत्ता १० वी मध्ये शिकत असणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी मोफत आयोजन केलेल्या व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी प्राचार्य एम. एल. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावळी माजी शिक्षण वि.अधिकारी एम. टी. कांबळे, वाचनालयाचे अध्यक्ष अनिल आपासो सुरुतकर, कणेरी येथील काडसिद्वेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक अर्जून होनगेकर, व्याख्याते व्ही. एल. सुतार व संजय साबळे (विषय मराठी) एम. एन. शिवनगेकर, माणगांव केंद्र शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार होनगेकर, उपाध्यक्ष जगदिश वाघराळे, सुनिल पाटील, सुधीर लांडे, वैजनाथ हारकारे, प्रमोद होनगेकर, सुभाष कांबळे, दयानंद होनगेकर उपस्थित होते. प्रास्ताविक सटूप्पा फड़के सूत्रसंचालन अनिल शि. पाटील यानी केले. सचिव अशोक बेनके यानी मानले.     

        या व्याख्यानमालेत रविवार दिनांक ८/१/२०२३ रोजी वेळ सकाळी १०.३० ते सायं ५ -००, विषय - इंग्रजी १ ले सत्र मार्गदर्शक  के.डी. बारवेलकर (संजय गांधी विद्यालय नागणवाडी) २ रे सत्र, मार्गदर्शक पी. एस. मगदूम (बी. डी. विद्यालय डुक्करवाडी) रविवार दि. १५//२३ विज्ञान १ दयानंद डी होनगेकर (दुंडगे हाय. दुंडगे) विज्ञान २ एस. ए. पाटील (जनता विद्यालय तुर्केवाडी) रविवार २२ / १ / २० २३ गणित भाग १ एम. के. पाटील (गुरुवर्य गुरुनाथ पाटील विद्यालय म्हाळेवाडी ),गणित भाग २ बी.आर चिगरे (न्यू. इंग्लिश स्कूल चंदगड) हे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असुन या व्याख्यानमालेचे लाभ चंदगड तालुक्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन माणकेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनिल सुरुतकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment